एक आटपाट नगर होते.. त्यात एक राजा होता.. त्याची प्रजा होती. काही सेवक होते.काही दास होते. एके दिवशी अचानक एक जण उठतो आणि राजा आणि त्याची प्रजा तसेच राजाच का उच्च आणि आपण कनिष्ठ ह्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करतो..त्याला राजाचे सैनिक पकडतात आणि brainwash camp मध्ये पाठवतात आणि त्याच्या मनावर ठसवले जाते की ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करताना हे नियम सांगितले आहेत ज्यामुळे समाजातील संतुलन कायम राहील.. आपल्याला हे संतुलन बिघडवण्याचा काहीच अधिकार नाही. आणि सर्व जण समान झाले तर राज्य कोण करणार.. आपला उद्धार कोण करणार??? त्या उठाव करणाऱ्या व्यक्तीला हि गोष्ट पटते आणि तो राजदरबारी सेवक म्हणून रुजू होतो.
नव्यानेच आलेल्या आर्टिकल 15 ह्या चित्रपटात ह्याच व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा एक प्रयत्न अनुभव सिन्हा ह्या दिग्दर्शकाने केला आहे.
दिल्लीस्थित उच्चभ्रू वर्गातील अयान रंजन आयपीएस होऊन पोस्टिंगसाठी (इथला आयपीएस आयान(आयुष्मान) हा माझ्या आवडत्या सरफ़रोश मधील आयपीएस राठोड(आमिरखान) पेक्षा देखील ग्राउंड वर आहे व हिरोगिरीच्या अनेक शक्यता व जागा असतांनाही तो संयत आहे हे विशेष) उत्तर प्रदेशमध्ये एका मागास जिल्ह्यात येतो आणि तिथे निर्माण झालेल्या व्यवस्थेचा आव्हान देऊन तिथे एका दलीत कुटुंबावर होणाऱ्या अत्याचारास वाचा फोडतो आणि न्याय मिळवून देतो..
तसे बघायला गेले तर गोष्ट एवढीच.. देश स्वतंत्र झाल्या पासून अशा हजारो घटना घडल्या आहेत जिथे बहुसांख्यिकी लोकांनी अल्पसंख्याक वर अत्याचार केलेत.. स्थळानुसर बदल फक्त कथेच्या पात्रांमध्ये आहे. कधी हिंदू कधी मुस्लिम तर कधी दलित वा कधी सवर्ण..पण समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आणि प्रत्येक स्तरावर अत्याचार होतच आहेत
मग आज नवीन काय??
ह्या चित्रपटाने व्यवस्थेच्या संवेदनशीलता वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झाडाला लटकणारे १५ वर्षीय मुलींचे शव बघूनही लहान मुलगा शांतच राहतो.. आपल्या सांगण्या प्रमाणे मेडिकल रिपोर्ट बदलत नाही म्हणून डॉक्टर लाच हिनवून आमच्या टॅक्स च्या पैसावर कोटा मार्गाने शिकतात अशी कॉमेंट करणे..आणि असे बरेच प्रसंग आपल्याला पुन्हा पुन्हा माघे वळून पाहण्यास मजबूर करतात..आणि मन आपल्या आजुबाजूस घडणाऱ्या गोष्टीशी संबंध जोडायला लागतो.
ये औकात क्या होती है? याचे दिले गेलेले उत्तर, ' उतना देते हैं जितनी उनकी औकात है.' चित्रपटात औकात शब्द अनेकदा येतो आणि त्यात त्याचा त्या वातावरनातील अर्थही असा उलगडून सांगितला जातो.
दिल्ली निर्भया केस, जम्मू काश्मीर रेप केस व कठूआ रेप अँड हँग केस या सर्व सत्य घटनांची आठवण हा चित्रपट पाहतांना येतो. पण मुळात तो फक्त या विषयावर नसून जातीत गाडल्या गेलेल्या भारतीय मानसिकतेवर आहे.
म्हणून आर्टिकल 15 हे घटनेचे सेक्शन मोठ्या कागदावर प्रिंट काढून अंशुमन पोलीस स्टेशन च्या बाहेर लावतो तेव्हा सर्व जण उत्सुकतेने ते वाचायला लागतात. आपली ओळख सांगतांना ते अशा पद्धतीने जातींचा उल्लेख करतात जस ते आपली वेगवेगळी नावे सांगत आहेत. उत्तर भारतात काम करणारे मित्र सांगतात तिकडे 'कौन जात' हा प्रश्न खूप नॉर्मल आहे, त्याची सवय होईपर्यंत खूप ऑकवर्ड वाटते नंतर सवय होते. हि सवय इतकी नॉर्मल बनते कि त्या उत्तरावर आधारित discrimination व्हायला लागते ते कळत नाही व आपण काही गुन्हा करतोय हेही कळत नाही. भयंकर आहे सगळे.
आर्टिकल 15 ने हे संवेदनशीलतेवर प्रश्न करणारे बेरिंग कुठेही सोडले नाही याबाबत डायरेक्टर अभिनंदनास पात्र आहे. प्रशासनातील खालच्या स्तरावर काम करणारे कर्मचारी वा अधिकारी मग ते पोलीस असो डॉक्टर असो वा अजून कोणी पण त्यांच्यातील परस्पर संबंध जातीसह अनेक बाबतीत किती गुंतागुंतीचे असतात व बॉस बदलला कि त्यांना ते कस बदलाव लागत हि एक वेगळी बाजू यात दाखवली आहे. याबाबतील दृश्य व डायलॉग्ज वास्तववादि आहेत.
'आप को झाड़ू ही लगाने देना चाहिए था.......' या अपमानावर फक्त डोक्यातील टोपी काढून 'कब तक लगायेंगे हम झाड़ू ...म्हणून त्या दलित पोलिसाच्या चेहर्यावरील हावभाव खुप काही सांगुन जातात...त्याने न बोललेले पुढील अनेक संवाद आपल्या डोक्यात चमकुन जातात. पण त्याचे ते त्या प्रसंगी शांत राहने हजार शब्दांचे काम करतात.
चित्रपटातील अजुन एक उल्लेखनीय बाब म्हणजे वर वर आपण कितीही आदर्शवादी गप्पा मारल्या तरी गटारी साफ़ करणे, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावने हि सर्व तुच्छ समजली जाणारी कामे अजुनही दलित समाजातील लोकच करत आहेत हे अनेक लहान मोठ्या दृश्यातुंन पण तरीही अंडरटोन राहून चित्रपटात दाखवले आहे. तो टोन खर तर प्रेक्षकांनी पकड़ने गरजेचे आहे. पोलिस स्टेशन मधील गटारीचे मेन होल मधील गटारीतील घाण उपसताना दाखवलेला कामगार हा या जगाचे प्रतिनिधिक रूप दाखवतो. कोर्ट या मराठी चित्रपटात या बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तो इतक्या अबोध स्वरूपात दाखवला गेला होता की तो सामान्य प्रेक्षकांपर्यन्त फारसा पोहचला नाही.
ज्या प्रमाणे सीमेवरील जवान लढताना शहीद होतो आणि त्याचे सन्मान केला जातो पण आपणास माहीत आहे का की गटार साफ करणाऱ्या सरकारी कर्मचारी मधे मरणाचे प्रमाण कितीतरी जास्त आहे पण संवेदनशीलता हरवलेल्या समाजाला फक्त तैमूरचेच रडणे दिसणार..पण काही घटकांचा आक्रोश नाही..
"हम कभी हरिजन हो जाते है, तो कभी बहुजन हो जाते है, बस जन नहीं बन पाते. वो जन गण मन वाले जन मे हमारी भी गिनती हो जाये" अस सणसणीत वास्तव पण आपल्यापुढे मांडलं जात तेव्हा ते सर्वांना पटतं.
आपल्या संगणीला आयुष्यमान खुराणा परिस्थिती समजून सांगत असताना विषण्णपणे म्हणतो की इथे खूप UnMess झाल्यात गोष्टी.. हा शब्दच मुळी नाही असे म्हणाल्यावर नवीन शब्द आणि नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागतील हे सांगताना त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून जातात.
देशाच्या संविधानाला केराची टोपली दाखवणाऱ्या समाजाला ज्यावेळेस निषाद "यही तो लढाई है की इस संविधान की.. उस किताब की चलानी पडेगी ओर उसिसे चलेगा ये देस " हा आशावाद दाखवला जातो तेव्हा डोळस प्रत्येक नागरिकाचा चेहरा तिथे प्रतित होत राहतो.
एका मोहिमेवरून परतल्यावर सर्व जण थकून भुकेले असतात तेव्हा एका अनोळखी अम्मा ने बनवलेली रोटी खातात आणि खात असताना आयुष्मान अचानक विचारतो की कोण जात हो अम्मा आणि तिचे उत्तर ऐकण्याची उत्सुकता वाढली असतानाच तिथून एक ट्रक मोठा हॉर्न वाजवत जातो ज्याचा माघे लिहले असते.. "मेरा भारत महान." आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचे आशावादी चित्र स्पष्ट होत राहते.
एका मोहिमेवरून परतल्यावर सर्व जण थकून भुकेले असतात तेव्हा एका अनोळखी अम्मा ने बनवलेली रोटी खातात आणि खात असताना आयुष्मान अचानक विचारतो की कोण जात हो अम्मा आणि तिचे उत्तर ऐकण्याची उत्सुकता वाढली असतानाच तिथून एक ट्रक मोठा हॉर्न वाजवत जातो ज्याचा माघे लिहले असते.. "मेरा भारत महान." आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचे आशावादी चित्र स्पष्ट होत राहते.
अनुभव सिन्हा ह्यांच्या ह्या चित्रपटामध्ये हि सर्व भावनिक उलथापालथ बघायला मिळते.. हरवलेली संवेदनशीलता दिसते आणि कुठे कुठे आशावाद ही येत राहतो..पण प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित होत राहते की देशाला हिरोची गरज नसून अशा लोकांची गरज आहे जे हिरोची वाट न पाहता समाजातील चुकीच्या गोष्टींसाठी लढाई करतील.
चला तर मग लागा कामाला...
जाता जाता...
प्रभू रामचंद्र वनवास संपवून परत येत असतात.. जागोजागी प्रत्येक गावात दिव्यांची सजावट आणि लखलखाट केलेला असतो..फक्त एका गावात अंधार पसरलेला असतो. प्रभू राम ह्यांच्या लक्षात येते आणि ते त्या गावकऱ्यांना विचारतात की काय झाले..तुम्ही आनंदी नाहीत का.. गावकरी सांगतात.. प्रभू दिवे तर आम्ही पण लावले होते पण अचानक एक वादळ आले आणि सर्व दिवे अचानक विझले.पण त्या नंतर आमची नजर तुमच्या महालावर पडली तर तो अधिकच चमकदार आणि रोषण दिसला. आणि म्हणून आम्ही दिवे पुन्हा पेटवलेच नाहीत..
आता हा प्रश्न मी तुमच्या वरच सोपवतो की त्यांनी दिवे पेटवावेत की नाही..???
जयहिंद.. वंदे मातरम्!!!
चला तर मग लागा कामाला...
जाता जाता...
प्रभू रामचंद्र वनवास संपवून परत येत असतात.. जागोजागी प्रत्येक गावात दिव्यांची सजावट आणि लखलखाट केलेला असतो..फक्त एका गावात अंधार पसरलेला असतो. प्रभू राम ह्यांच्या लक्षात येते आणि ते त्या गावकऱ्यांना विचारतात की काय झाले..तुम्ही आनंदी नाहीत का.. गावकरी सांगतात.. प्रभू दिवे तर आम्ही पण लावले होते पण अचानक एक वादळ आले आणि सर्व दिवे अचानक विझले.पण त्या नंतर आमची नजर तुमच्या महालावर पडली तर तो अधिकच चमकदार आणि रोषण दिसला. आणि म्हणून आम्ही दिवे पुन्हा पेटवलेच नाहीत..
आता हा प्रश्न मी तुमच्या वरच सोपवतो की त्यांनी दिवे पेटवावेत की नाही..???
जयहिंद.. वंदे मातरम्!!!




